
इगतपुरीनामा न्यूज – घोटी सिन्नर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आज सकाळी भीषण अपघात झाला. या घटनेत एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इगतपुरी तालुक्यातील धामणी परिसरात घडली आहे. शिवाजी विष्णू ठोके वय ३५ रा. अधरवड असे अपघातग्रस्त दुर्दैवी युवकाचे नाव असल्याचे समजते. हा अपघात इतका भीषण होता की शरीराचे दोन तुकडे झाले. अर्धा भाग वीस ते पंचवीस फुटावर फरपटत नेला आहे. यावेळेस ट्रक चालकाने ट्रक क्रमांक MH 16 AY 5558 सोडून पलायन केले आहे. अपघातस्थळावर घोटी पोलीस दाखल झाले आहेत.