
इगतपुरीनामा न्यूज – समाजाचे आपण काही देणे लागतो या नात्याने इगतपुरी तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी रामदास गव्हाणे यांनी मुलगा देवराज याच्या वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत घोटी येथील आरएसएसच्या वनवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान केले. यावेळी रमसास गव्हाणे म्हणाले कि, इगतपुरी हा आदिवासी तालुका असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी आश्रमशाळा व वनवासी वस्तीगृह आहेत. त्यामुळे काही गरीब व गरजू पालक या विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत टाकतात. मात्र त्या विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी समाजातील दानशूर दात्यांनी वाढदिवसाचे वायफळ खर्च टाळत अशा ठिकाणी अन्नदान करावे. यावेळी वनवासी वसतिगृहात देवराज रामदास गव्हाणे याच्या वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत वनवासी वसतिगृहात अन्नदान वाटप करण्यात आले. याप्रसंगी ॲड. उत्तम गव्हाणे, रामदास गव्हाणे, उध्दव मोराडे, डॉ. गोपाळ चव्हाण, संदीप गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
