विविध क्षेत्रातील संधींचा अभ्यास आणि मुलाखतीच्या उपक्रमातून स्वत:चे वेगळेपण सिध्द करावे : प्राचार्य भाबड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच स्वतःच्या पायावर कसे उभे राहाता येईल त्यादृष्टीने विचार करून विविध क्षेत्रातील संधींचा अभ्यास करावा. परिसर मुलाखतीच्या उपक्रमातून स्वत:चे वेगळेपण सिध्द करावे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात परिसर मुलाखत व करिअरच्या विविध संधी याविषयावर आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते.

याप्रसंगी पुणे येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडिजच्या व्यवस्थापिका रिंकू पाटील, करिअर मार्गदर्शक जिवन साळवे, कॅप्टन संजय डेरवणकर, श्वेता मल्होत्रा, सोनाली कांबळे, रूपाली खिलारे, विवेक राहुड, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. यू. एन. सांगळे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पी। आर. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, उच्च शिक्षण क्षेत्रात आता मोठ्या प्रमाणात बदल होत असून नवीन शैक्षणिक धोरणाला आता आपल्याला सामोरे जायचे आहे. याप्रसंगी रिंकू पाटील, जीवन साळवे, संजय डेरवणकर यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्राचार्य भाबड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. बी. घोंगडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. के. एम.वाजे यांनी केला. आभार परिसर उपक्रमाचे प्रमुख प्रा. गोपाळ लायरे यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!