जिल्हा परिषदेत पेन्शन अदालतीला सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह : सेवानिवृत्त सेवक असोसिएशनच्या साहाय्याने पेन्शन अदालत संपन्न

पुढील महिन्यात सर्व खात्यांची संयुक्त पेन्शन अदालत होणार

सुभाष कंकरेज, इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या आदेशान्वये नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागप्रमुखांच्या दालनात पेन्शन अदालत संपन्न झाली. संघटनेचे उपाध्यक्ष रविंद्र बापूसाहेब थेटे यांच्या नेतृत्वाखाली आणि संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख सुभाष कंकरेज यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे अध्यक्ष उत्तम बाबा गांगुर्डे, सरचिटणीस मधुकर कांगणे यांच्या उपस्थितीत पेन्शन अदालत घेण्यात आली. यावेळी १०० पेक्षा जास्त सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांमध्ये सेवानिवृत्त महिला कर्मचारी भगिनींची संख्या मोठ्या संख्येने होती.

प्रथम उपमुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. प्रशासन अधिकारी रविंद्र आंधळे यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी सकारात्मक व तातडीने कार्यवाही करण्याबाबत सांगितले.

आरोग्य विभागाच्या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर यांच्या दालनात प्रत्येक सेवानिवृत्त कर्मचारीनिहाय प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. मागील महिन्याच्या पेन्शन अदालतमध्ये उपस्थित केलेल्या प्रलंबित प्रकरणे मंजूरीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित प्रलंबित प्रकरणांची मंजुरी व लाभाच्या रक्कम दिवाळीपुर्वी देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन लाभाचे देयके व अनुदान उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा मुख्य लेखा अधिकारी महेश बच्छाव साहेब यांच्या दालनात करण्यात आली. श्री. बच्छाव यांनी देयक मंजुरी व नियमित पेन्शन मिळणे, अनुदान उपलब्धता, बीडीएस संगणक प्रणाली आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. लेखा विभागच्या संदर्भातील प्रलंबित बाबींची संबंधित अधिकारी कर्मचारी यांना त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. पुढील महिन्यातील पेन्शन अदालत जिल्हा परिषद कार्यालयातील सर्व विभागांची संयुक्त व्हावी असे व्यक्त केले. बांधकाम विभागाच्या संदर्भातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्याकडे प्रकरण निहाय चर्चा करण्यात आली.
        
आजच्या विभागवार पेन्शन अदालतीमध्ये नियमित पेन्शन ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे मंजूर करून त्वरीत सुरू करणे, भविष्यनिर्वाह निधी व गटविमा रक्कम त्वरित संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा करणे, अंशराशीकरण, रजा रोखीकरण,  स्वग्राम इत्यादी देयके अदा करण्याबाबत, ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे १०-२०-३० आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे, संगणक प्रशिक्षण विषयी करण्यात येत असलेली वसुली ( प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक ) बाबत, अपंग किंवा मतिमंद वारसांना कुटुंब निवृत्तीवेतन सुरू करणे बाबत, जात वैधता प्रकरणी बंद केलेले निवृत्तीवेतना बाबत सविस्तर चर्चा झाली. पुढील महिन्यात पेन्शन अदालत संयुक्तिक होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

आजच्या विभागवार पेन्शन अदालतमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, प्रशासन अधिकारी रविंद्र आंधळे, स्वरांजली पिंगळे आदींनी उपस्थितांना सविस्तर माहिती व सकारात्मक आश्वासन दिल्याबद्दल नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन नाशिक संघटनेकडून आभार व्यक्त आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष उत्तम बाबा गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष कंकरेज, कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, काष्ट्राईब कल्याण कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष एकनाथ मोरे आणि इतर सर्व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!