
इगतपुरीनामा न्यूज, दि. 7
4 ऑक्टोबरला अस्वली ते लहवीत रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे लाईनवर अंदाजे 30 ते 35 वर्षीय अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी आढळला. त्याला नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी उपचारासाठी दाखल केले. मात्र तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबत वाडीवऱ्हे पोलिसांनी नोंद घेतली आहे. ह्या मयत व्यक्तीच्या वारसाचा आणि कुटुंबाचा शोध लावण्यासाठी वाडीवऱ्हे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
मयत इसम हा अनोळखी व्यक्ती असुन वय अंदाजे 30 ते 35 आहे. शरीराने मजबूत, चेहरा गोल, वर्ण गोरा, उंची 5 फूट 5 इंच, अंगात सफेद रंगाचा हाफ शर्ट, काळसर रंगाची जीन्स पॅन्ट, डोक्याचे केस अर्धवट कलर केलेले असे त्याचे वर्णन आहे. तरी त्यांच्या नातेवाईकांचा किंवा मित्रांचा तपास लागल्यास वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचा फोन नंबर 02553-236533 अथवा तपासी अंमलदार प्रवीण मोरे यांच्या 9623121439 या क्रमांकावर कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.