भीमाच्या लेकींकडून पिंप्री सदो‌ येथे त्यागमूर्ती माता रमाई‌ यांची जयंती उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो‌ येथे त्यागमूर्ती माता रमाई‌ यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे आयोजन बिनधास्त महिला मंडळातर्फे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामसेवक गुलाब साळवे, पोलीस पाटील रमेश पाटेकर, ग्रामपंचायत सदस्य, बिनधास्त मित्र मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे शाल व गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सुन्नी मुस्लिम जमातच्या वतीने माता रमाई जयंती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. महिला मंडळाच्या वतीने भिमाच्या लेकी काजल सुरेश भवर, पूजा बबलु उबाळे, हर्षदा किशोर उबाळे, शितल सुरेश भवर, साक्षी रतन उबाळे, सानिया मितीन उबाळे, साक्षी लालचंद उबाळे, आम्रपाली नितीन उबाळे, सानिका सागर उबाळे, उषा बाळु उबाळे, राखी कैलास उबाळे, सूत्ति संतोष उबाळे, तनिषा शिवाजी उबाळे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा ‌उबाळे, ज्ञानेश्वर उबाळे यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!