
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा साठा पकडून मोठी कारवाई केली आहे. टाकेद बुद्रुक येथे पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या महावीर किराणा आणि जनरल स्टोअर्समधून ३७ हजार ७४७ रुपये प्रतिबंधित गुटखा आणि तत्सम उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. मंगेश रामचंद्र वारुंगसे यांच्या किराणा दुकानातून १५ हजार २४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तत्सम उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. विशेष पथकाने याबाबत घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार राजेंद्र मानकलाल छाजेड वय ६२ रा. टाकेद बुद्रुक, मंगेश रामचंद्र वारुंगसे रा. टाकेद बुद्रुक या संशयित आरोपीना अटक करण्यात आली आहे. दोन्ही प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून घोटी पोलीस पुढील तपास करीत आहेत.