इगतपुरीनामा न्यूज – पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमाप यांनी दिलेल्या सुचना मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे आदेशाने मिळालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांचे गुप्त बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाबासाहेब कोते, योगेश दादाजी पाटील, शांताराम पंढरीनाथ घुगे, प्रशांत सुरेश पाटील यांच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनका येथे गाडी क्र. एमएच ०४ ईवाय ९७६८ या वाहनातून १४ लाख ३४ हजार ३०० किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तत्सम वस्तू आणि १० लाखांचे वाहन हस्तगत करण्यात आले आहेत. पंचासमक्ष पंचनामा करुन महाराष्ट्र शासनाचे अधिसुचनाप्रमाणे महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा, वितरण व साठ्यास प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखू व जर्दा/गुटखा सदृश्य मालाची लपुन छपुन वाहतुक करतांना मिळुन आल्याने संशयित आरोपी सुनिल भय्यालाल गुप्ता, वय ३२ रा. साह महढा, फतेपुर उत्तर प्रदेश, सोहेल खान शकील खान, वय २३ रा. रेहमा अपार्टमेंट बाबूपुरा कानपुर, मोहंमद परवेज खान यांच्यावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून स्थानिक गुन्हा शाखेचे विशेष अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group