रणरागिणी पथकाकडून ठाकूरवाडी खेड भैरव येथे अवैध दारू बनवण्याचा गुन्हा उघड : २९०० लिटर रसायन आणि १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्धेमाल केला नष्ट

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील ठाकूरवाडी खेड भैरव येथे रणरागिणी पथकाने अवैध दारू बनवण्याचा गुन्हा उघड केला आहे. हातभट्टी निर्मूलन पथक अंतर्गत रणरागिणी पथकाने आज दुपारी ही धडक कारवाई केली. या कारवाईत २९०० लिटर रसायन आणि १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्धेमाल नष्ट करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील रणरागिणी पथकातील पोलीस सत्यभामा सोनवणे, वैशाली डावरे, रचना कापडे, त्रिवेणी बहारवाल, सोनाली केदारे, शरद बोडके, चालक पुरुषोत्तम मोरे यांनी ही कारवाई केली. घोटी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत ठाकूरवाडी खेड भैरव येथे अवैध दारू बनवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ह्या ठिकाणी पायी जाऊन कारवाई केली. या कारवाईत २९०० लिटर रसायन आणि १ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्धेमाल नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी रणरागिणी पथकाकडून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घोटी पोलीस ठाण्यात सुरू झाला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!