हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या पिंप्री सद्रोद्दिन गावासाठी ३५ लाखांचा निधी देणार : आमदार हिरामण खोसकर

ज्ञानेश्वर लहाने यांच्या प्रयत्नांनी व्यायाम शाळा उदघाटन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

संपूर्ण राज्यभर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून सुप्रसिद्ध असणारे पिंप्री सद्रोद्दिन हे गाव सामाजिक एकता जपणारे गाव आहे. सर्वधर्मसमभाव जपत असणारे हे गाव माझ्या आवडत्या गावांपैकी एक आहे. ह्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. शहंशाह सद्रोद्दिन बाबा यांच्या उरुसानिमित्त पिंप्री सद्रोद्दिन येथे व्यायाम शाळेचा उद्घाटन समारंभ पार पडला. या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी आमदार हिरामण खोसकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इगतपुरी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने यांच्या प्रयत्नातून व्यायामशाळा बांधण्यात आली. श्री. लहाने नेहमीच ह्या गावाच्या विकास माझ्याकडे पाठपुरावा करीत असतात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इगतपुरी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने हे होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, उपसभापती विठ्ठल लंगडे, ज्ञानेश्वर लहाने, काँग्रेस नेते ऍड. संदीप गुळवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, पीके ग्रुपचे प्रशांत कडू, उपसरपंच अनिल भोपे, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, जगन कदम, नंदलाल भागडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पिंप्री सद्रोद्दिन येथील फिरोजभाई शेख, मतीन पठाण, अमजद पटेल, आसिफ पटेल, अखिल सय्यद, अबुबाकर पटेल, रामदास वाकचौरे, ताहीर पटेल, मुगनी पटेल आदींसह ग्रामस्थांनी केले होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!