गोंदे दुमाला येथील “सिद्धिविनायक” मध्ये ध्वजारोहण संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

गोंदेदुमाला श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये 75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त प्रतिष्ठित नागरिक व माजी पोलीस पाटील प्रकाश नाठे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश जाधव, लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे,उपसरपंच कचरू नाना धोंगडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन शांताराम जाधव आदींसह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य तुषारराव पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.