

इगतपुरीनामा न्यूज : राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांचा मंगळवारी २१ नोव्हेंबरला इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव दौरा निश्चित झाला आहे. याअनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून दौऱ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने केली आहे. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त नियोजित हेलिपॅड, शासकीय विश्रामगृह व दौरास्थळी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार असून वाहतूक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन केले जाईल. ताफ्यातील वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी केली जाणार आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव ह्या गावांना भेट देण्याचे नियोजन आहे. त्या ठिकाणी अनुषंगिक सुरक्षा व इतर बाबींचे संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे. संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम सोबत जोडला आहे.



