ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
श्रीराम शक्तीपीठ संस्थान येथे ५ ते १५ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणाऱ्या “विश्वशांती भारतीय संस्कृती धर्म सोहळा अर्थात “राष्ट्रीय भक्ती नामसंकीर्तन महोत्सव” या सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. पिठाधिश्वर श्रीराम शक्तीपीठ संस्थान अनंत विभूषित श्री श्री १००८ महामण्डलेश्वर स्वामी सोमेश्वरानन्द सरस्वती पंचायती आखाडा श्री निरंजनी श्री श्रेत्र चाकोरे, त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते झाले. संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्था, श्रीराम शक्तीपीठ संस्थान व श्री गुरुजी रुग्णालय,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोविशिल्ड लसीकरण, मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्त तपासणी, रक्तदान व मोफत औषधोपचार शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी रामायणाचार्य ह.भ.प. भास्कर महाराज रसाळ, ह.भ.प. माधव महाराज राठी, ह.भ.प. मधुकर महाराज शेलार, महंत श्रीनाथानन्द सरस्वती महाराज, महंत सिध्देश्वरानन्द सरस्वती महाराज, महंत सुदर्शनानन्द सरस्वती महाराज, महंत विश्वेश्वरानन्द सरस्वती महाराज, ह.भ.प. रविंद्र महाराज नन्नावरे, ह.भ.प. राहुल महाराज साळुंके, डाॅ. खैरे, डाॅ. मुंगी, धर्मवीर विक्रम नागरे, बाकेराव डेमसे, डाॅ. अजय कापडणीस, डाॅ. प्रणव कुलकर्णी, डाॅ. शुभम देशमुख, डाॅ. पवन आहेर, नगरसेवक व त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट सदस्य संतोष कदम, समाजसेवक प्रदीप परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.