श्री साई सहाय्य समिती, प्रभूनयन फाउंडेशनतर्फे “एक करंजी मोलाची”

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समिती आणि प्रभूनयन फाउंडेशनतर्फे खैरेवाडी या अतिदुर्गम आदिवासी पाड्यावर एक करंजी मोलाची उपक्रम अभिनव पध्दतीने राबवण्यात आला. दिवाळी सण सर्वत्र साजरा होत असतो. मात्र आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्याबरोबर तेजोमय दिवाळी साजरी करण्यात वेगळाच आनंद असतो. आदिवासी पाड्यावर आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आणि आदिवासी बांधवांची दिवाळी गोड प्रकाशमय व्हावी या हेतूने हा उपक्रम घेतला जातो. प्रभूनयन फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मवानी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील खैरेवाडी येथील आदिवासी बांधवांना दिवाळी निमित्त मिठाई व कपडे वाटप करण्यात आले. यावेळी समितीच्या सदस्यांनी या आदिवासी बांधवांमध्ये रमुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला. श्री साई सहाय्य समिती व प्रभूनयन फाउंडेशन यांनी आदिवासी बांधवाना फराळ, कपडे, मिठाई, फटाके वाटप केले. घरासमोर दीप प्रज्वलन, रांगोळ्या काढून दिवाळी साजरी केली. यावेळी श्याम आदमाने, राजू देवळेकर, नितीन चांदवडकर, सुमित बोधक, नितीन शुक्ला, भूमी चांदवडकर, नयना ठाकरे, प्रिया शुक्ला, काजल सिंग, अमन संघा, रमण संघा, रुद्र बऱ्हे, मयंक घाटकर आदी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!