
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
वीज वितरण महामंडळाच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण बैठक केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सध्या वीज वितरण मंडळाची सक्तीची बीजबिल मोहीम सुरू आहे. सर्वत्र सक्तीने शेतकऱ्यांकडून वीजबिल वसुली सुरू असून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांच्या डीपी कट केल्या जातात. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. शेतात पिके उभी असतांना विजेअभावी त्यांना पाणी देता येत नसल्याने शेतपिके धोक्यात आली आहे. आधीच अस्मानी संकटाने त्रस्त असलेला शेतकरी आता सक्तीच्या वीजतोडणीने त्रस्त झाला आहे. शेतातील उभी पिके जर विजेअभावी पाणी न मिळाल्याने जळाली तर शेतकरी मोठ्या संकटात सापडून उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ह्या विषयीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि ह्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी वीज मंडळांच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
“दिवाळीचा सण सुरू आहे बळीराजाची दिवाळी अंधारात घालवू नका. शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले तर शेतकरी विजबिले भरू शकतो. घरातल्या विजबिलाची रक्कम मिटरचे युनिट तपासून दिले जाते. मात्र शेतीचे वीजबिल हे अंदाजे दिले जाते. ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून त्यांच्यावर होणारा अन्याय त्वरित थांबवावा” असे प्रतिपादन ना. डॉ. भारती पवार यांनी तक्रार निवारण बैठकीत केले. वीज बिल थकीत असल्याने अनेक ग्रामपंचायतीचौ स्ट्रीट लाईटचा विद्युतपुरवठा खंडित केल्याने गावे अंधारात आहे. डीपी कनेक्शन तोडू नका, नादुरूस्त असलेल्या डीपी लवकर दुरुस्त करून बसवा. जिथे जिथे समस्या येत असतील तिथे जाऊन त्या सोडवा. अनेक शेतकऱ्यांनी आगाऊ रक्कम भरून नवीन डीपी साठी मागणी केली असून त्यांना लवकरात लवकर डीपी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केली. “बळीराजा हा खूप सहनशील आणि संवेदनशील असून तुम्ही आता त्यांचा अंत बघू नका” असेही ना. डॉ. भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले. ह्या बैठकीस नाशिक जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर. ज्ञानदेव पडळकर, सानप साहेब, डोंगरे साहेब ,आव्हाड साहेब, तडवी साहेब, भामरे साहेब, संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव, शंकरराव वाघ, एन. डी. गावित सुवर्णा जगताप, भागवत बोरस्ते, यतीन कदम, दीपक खैरनार, बापू पाटील, सतीश मोरे भाजपा इगतपुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, जेष्ठ नागरिक सेलचे तालुकाध्यक्ष हिरामण शिंदे उपस्थित होते. यावेळी इगतपुरी तालुक्यातील विजेच्या बाबत भाऊसाहेब कडभाने हे अतिशय आक्रमक होऊन यांनी तालुक्यातील समस्या मांडल्या. शासनाचा जाहीर निषेध नोंदवला.