
इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर शहरातील विविध कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती धरीत पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या कार्यपद्धतीद्वारे विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, त्र्यंबकेश्वरचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. त्र्यंबकेश्वर शहरातील सामाजिक कार्यकर्ते किरण चौधरी, रवी भांगरे, रमेश आचारी, दामू गुंड, देवचंद जाधव आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी पक्षप्रवेश देऊन सर्वाना कामाला लागण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.