विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्मित होण्यासाठी उपक्रमांची आवश्यकता : भाऊसाहेब खातळे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळेल. त्यांच्यामध्ये उर्जा निर्माण होईल यासाठी शैक्षणिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी केले.

इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रिन ऑडिट व जेंडर ऑडिट उपक्रमाप्रसंगी श्री. खातळे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, ॲड. रेश्मा जाधव, प्रा. डॉ. मिनाक्षी गवळी, हेमंत सुराणा, डॉ. हेमंत पाटील, शोभा आहेर, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भाऊसाहेब खातळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शिक्षणाचे योगदान महत्त्वाचे असून प्रत्येकाला उच्च शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे. याप्रसंगी प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, ॲड. रेश्मा जाधव, प्रा. डॉ. मिनाक्षी गवळी, हेमंत सुराणा, डॉ. हेमंत  पाटील, शोभा आहेर , प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांची भाषणे झाली.

प्रारंभी प्रा. एल. डी. देडे, प्रा. ए. वाय. सोनवणे, प्रा. डॉ. डी. लोखंडे, प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. डॉ. आर. एम. गवारे, प्रा. एच. आर. वसावे, प्रा. डॉ. के. एम. वाजे, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. आर. एम. आंबेकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी याप्रसंगी गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालय राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. के. शेळके यांनी केले.