गंभीर गुन्ह्यातील आरोपी इगतपुरी पोलीस पथकाकडून जेरबंद : इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने कारवाईला यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपीला शिताफीने अटक केली आहे. सचिन सुभाष म्हसणे वय २४ रा. फांगूळगव्हाण ता. इगतपुरी असे संशयित आरोपीचे नाव आहे. इगतपुरी पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये गंभीर गुन्हा दाखल आहे. ह्या गुन्ह्यात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०७, १४३ आदी कलमानुसार आरोपीला अटक करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सचिन देसले, मुकेश महिरे, शरद साळवे, सचिन मुकणे, राहुल साळवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे. इगतपुरी रेल्वे पोलिसांना सुद्धा अन्य गुन्ह्यात ह्या आरोपीची चौकशी करायची असल्याचे समजते.

Similar Posts

error: Content is protected !!