इगतपुरीनामा न्यूज – मतदानासाठी पात्र महिला आणि अन्य मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी अखेरच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदान नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने २९ मे २०२३ च्या पत्रान्वये १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. ह्या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणी करण्यासाठी स्वीप कार्यक्रम अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यानुषंगाने १२७ इगतपुरी ( अ. ज. ) विधानसभा मतदार संघ इगतपुरी तालुका अंतर्गत महिला मतदार यांचे मतदार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी घाटनदेवी इगतपुरी येथील नवरात्रोत्सव यात्रेत “उत्सव नवरात्रोत्सवाचा जागर मताधिकाराचा, सन्मान नारी शक्तीचा” या हॅशटॅग द्वारे जनजागृती करण्यात आली. १ जानेवारी २०२४ रोजी पात्र महिला मतदार यांनी नमुना ६ भरून मतदार नोंदणी करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार अभिजीत बारवकर, निवडणूक नायब तहसिलदार वर्षा वाघ यांनी केले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group