अंगणवाडी सेविकांना २ हजार रूपयांची भाऊबीज भेट – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

सन २०२१-२०२२ या वित्तीय  वर्षासाठी भाऊबीज भेट दोन हजार रूपये देण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज दि. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी जारी करण्यात आलेला आहे. यासाठी यंदाच्या वित्तिय वर्षात एकूण 37 कोटी 97 लाख 32 हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना ही भाऊबीज भेट अदा करण्यात येणार आहे.

आम्हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलेली भाऊबीज भेट अतिशय मोलाची आहे. ह्याबाबत आम्ही महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि राज्य शासनाचे आभार मानतो.
- धनश्री शिंदे, पिंपळगाव घाडगा

Leave a Reply

error: Content is protected !!