पिंपळगाव मोर येथे लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24 ( निलेश काळे, पिंपळगाव मोर ) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरास पिंपळगाव मोर येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

ग्रामपंचायत पिंपळगाव मोर व काळूस्ते आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी शिबिरामध्ये लसीकरणाबरोबरच जनजागृती व घ्यावयाची काळजी आणि मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीच्या सरपंच हिराबाई गातवे यांच्या हस्ते उदघाटन झाले.

लस घेतल्यानंतर नागरिकांनी कोरोना आजाराबाबत मनातल्या शंकांचे निरसन केले. गृह अलगिकरणामध्ये घ्यायची काळजी तसेच आहाराबाबत सखोल माहिती ग्रामस्थांनी घेतली. गावातील ४५ वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेऊन अभूतपूर्व प्रतिसाद नोंदवला. शिबिरावेळी सरपंच हिराबाई गातवे, ग्रामविकास अधिकारी संतोष जाधव यांसह गावातील स्वयंसेवक यांनी शिबीर पार पाडण्यास सहकार्य केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कोळी, डॉ. एन. पी. बडगुजर, आरोग्य सहाय्यक लोड्रिक, आरोग्य सहाय्यक आर. एस. आवारी, बी. आर. गायकवाड, एम. डी. पगारे, आरोग्यसेवक एस. एस. दिंडे, आर. बी. पाटील, यू. एम. घोरपडे, आशा कर्मचारी एस. एस. तोकडे, एस. आर. तोकडे, यू. एच. तोकडे, एस. जे. बेंडकोळी, एम. एस. पगारे, अंगणवाडी कर्मचारी एस. डी. भोसले, ए. एस. गातवे, जे. एच. मडके, आणि जि. प. प्राथ शाळा पिंपळगाव मोर येथील के. के.भोईर, पी. एस. चव्हाण, एच. के. साबळे आदींनी शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.