

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील जैन श्वेताम्बर आदेश्वर मंदिरात चोरी झाली आहे. मंदिर गाभाऱ्यातुन भगवान शांतीनाथ, सिद्धचक्र भगवान व अष्टमंगल गट्टू ह्या मूर्तीची चोरी झाली आहे. या मूर्ती ५० वर्ष जुन्या आणि पंचधातूच्या असून त्यांचे वजन दोन ते अडीच किलो होते असे मंदिर विश्वस्थ यांचे म्हणणे आहे. हा सर्व चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु झाला आहे. घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, हवालदार शिवाजी शिंदे, केशव बसते, योगेश यंदे, श्वान पथक विभागाचे संतोष कडाळे, विठ्ठल बोरसे, अंगुली मुद्रा विभागाचे पोलीस निरीक्षक जोशी, पो. शि. गांगुर्डे, शैलेश गांगुर्डे, किशोर पाटील हे अधिक तपास करत आहे.