कसारा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लोकलचा एक डबा रुळावरून घसरला

इगतपुरीनामा न्यूज – मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्टेशन भागात लोकलचा पाठीमागील एक डबा रुळावरून घसरल्याची घटना रात्री घडली आहे. प्लॅटफॉर्म नंबर ४ वर ही घटना झाल्याचे समजते. मुंबईहून येणारी लोकल शन्टींगसाठी जात असताना रुळावरून डबा घसरला. मध्य रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. उतरलेला डबा रुळावर आणायचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ह्या घटनेमुळे अप आणि डाऊन मार्गाच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Similar Posts

error: Content is protected !!