अंगावर उकळते पाणी पडल्याने २ वर्षाच्या बालिकेचा उपचार सुरु असतांना मृत्यू

इगतपुरीनामा न्यूज – घरात खेळत असताना अंगावर उकळते पाणी पडल्याने गंभीर भाजलेल्या २ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयश्री तुकाराम शिद वय २ वर्ष, रा. कुशेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. याबाबत वाडीवऱ्हे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयश्री ३० ऑगस्टला रात्री ८ वाजता खेळत होती. त्यावेळी घरातील चुलीवरील उकळते पाणी तिच्या अंगावर पडले होते. यात ती गंभीर भाजल्याने वाडीवऱ्हे येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला.

Similar Posts

error: Content is protected !!