इगतपुरी तालुका सकल मराठा समाजातर्फे लाठीचार्ज घटनेबद्धल शासनाचा निषेध : इगतपुरीच्या तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली ता. अंबड येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांततेत सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचा इगतपुरी तालुका मराठा समाजाने तीव्र निषेध केला आहे. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांना आज इगतपुरी तालुका सकल मराठा समाजातर्फे निषेधाचे निवेदन देण्यात आले. यापुढेही रस्त्यावर उतरून निषेध करून शासनाला आपली एकजूट दाखवली पाहिजे, यासाठी प्रत्येक गावातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत आपल्या गावात लाठीचार्जचा निषेध व्यक्त करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. लवकरच बैठकीचे नियोजन करून मराठा समाजाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. मराठा समाजाची अभेद्य एकजूट दाखवून देऊन राज्य शासनाला व पोलीस प्रशासनाला आम्ही मोडू पण वाकणार नाही हे दाखवून देऊ असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!