जालना येथील निषेधार्ह घटनेला जबाबदार राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचा निषेध : नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीने संताप व्यक्त : उद्याच्या महाराष्ट्र बंद मध्ये होणार सहभागी

इगतपुरीनामा न्यूज – जालना येथील मराठा समाजाचे शांततेच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन जाणून बुजून भडकवण्यासाठी आणि चिरडून टाकण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून तीव्र लाठीचार्ज करण्यांत आला. महिला, वृद्ध ,लहान मुले, युवक आदींवर कुठलीही शहानिशा न करता लाठीचार्ज करण्यात आला. ह्या घटनेचा नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने आज जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक येथे आज समाजातील अनेक बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्वांनी जोरदार निषेधाच्या घोषणा देत राज्य शासनाचा धिक्कार करण्यात आला. उद्या रविवारी ३ सप्टेंबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून ह्या आंदोलनाला नाशिक सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे. उद्याचा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी राजू देसले, शिवाजी मोरे, केशव गोसावी, उमेश शिंदे, डॉ. रुपेश नाठे, आशिष हिरे, ज्ञानेश्वर थोरात, नितीन दातीर, सागर पवार, योगेश नाटकर, गणेश कदम, राम खुर्दळ, संजय फडोळ, विशाल वारुळे, संदीप लभडे, सचिन आहिरे, अमित नडगे, प्रफुल्ल पवार, सचिन शिंदे, पुंडलिक बोडके, भारत पिंगळे, दिनेश नरवडे, योगेश कापसे, योगेश गांगुर्डे, यश बच्छाव, तुषार भोसले, कोटकर ज्ञानेश्वर, शुभम महाले, भूषण देसले, अजय कडभाने, ॲड. अजिंक्य, विशाल कदम, नारायण भोसले, सखाराम गव्हाणे, रतन नवले, ज्ञानेश्वर चव्हाण, कैलास गव्हाणे, बाळू सूरडे, गिते, विशाल घागत, निखिल सातपुते, माधवी पाटील, पुष्पा जगताप, मनोरमा पाटील, सुलोचना गवळी, रागिणी जाधव, निशिगंधा पवार, रोहिणी दळवी आणि संभाजी राजेचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!