
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे उद्या बुधवारी ६ ऑगस्टला विविध प्रकारचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र सचिव उमेशजी खातळे, युवक कार्याध्यक्ष सोमनाथ भाऊ घारे यांच्या नेतृवाखाली मुंबई नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या घोटी टोलनाक्यावर ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. याप्रसंगी इगतपुरी तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे, भाऊसाहेब खातळे, किरण कातोरे, वैभव धांडे, बाळा बोंडे, केशव बोडके, अमजद पटेल, सागर टोचे, सखाराम दुभाषे, सागर टोचे, विजय घाटे, वैभव पाटील, तुकाराम येलमामे, रोहित जाधव, गोकुळ जाधव, संपत नाठे, सुभाष जाधव, आकाश पारख, निवृत्ती आवारी, देविदास सुरुडे, नामदेव शिंदे, नरेंद्र गतीर, भोर, आदित्य जाधव, तानाजी आव्हाड, प्रशांत पाळदे, सचिन आव्हाड, शैला कुंदे, मीरा भोईर, नीता वारघडे आदी पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक कार्याध्यक्ष सोमनाथ भाऊ घारे यांनी सांगितले.