इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
कोरोना बरा होणाऱ्या रुग्णांची संख्या आज मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचा दिलासा आज इगतपुरी तालुक्याला मिळाला. यासोबत कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांची आजची संख्या सुद्धा अत्यल्प पातळीवर येऊन पोहोचली असल्याचा दुसरा दिलासा मिळाला आहे. आज तब्बल १० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार अवघे २ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज दिवस अखेर पर्यंत ८८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
रुग्णसंख्येत भर पडू नये ही जबाबदारी तालुक्यातील सर्व घटकांची आहे. निर्बंध शिथिल झाले असले तरी विनाकारण घराबाहेर पडू नये, गरज भासल्यास सर्व काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, कोरोना नियमावलीचे पालन करावे, मास्कचा वापर करण्यात हयगय न करता सगळ्यांनी योग्य पद्धतीने मास्कचा वापर करावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे.