नाशिक जिल्ह्यातील सायकलिस्ट कडून गरुडझेप शिवज्योती रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सत्तेला ३५५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच्या स्मरणार्थ सरनौबत पिलाजी घराण्याचे तेरावे वंशज मारूती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली व गरुडझेपच्या माध्यमातून आग्रा ते राजगड हे १२०० किलोमीटर अंतर 13 दिवसात धावत पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यानुसार पुणे येथील 57 शिवप्रेमी सतत धावत आहेत. ह्या मोहीमेंतर्गत आज मंगरूळ फाटा येथे शिवज्योत रॅलीस देवळा सायकलिस्ट अरुण पवार यांनी भेट देऊन स्वागत केले. त्यांनी शिवज्योत बरोबर रनही केला. मारुती गोळे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

पिंपळगाव सायकलिस्ट नितीन डोखळे यांनी पिंपळगाव ते सोग्रस फाटा सायकलीने जाऊन शिवज्योत रॅलीचे स्वागत केले. त्यांनी रॅली बरोबर 2 किमी रन केला. नितीन भाऊ यांच्या परिवाराने शिवज्योतीचे व त्यांच्याबरोबर सर्व मावळ्यांचे औक्षण केले. नाशिकचे सायकलिस्टचे संजय पवार यांनी नासिक ते वडाळीभोई असा सायकलीने प्रवास केला. त्यांनी आज  गरुडझेप, शिवज्योत रॅली निमित्त 101 किमी सायकलिंग केली. शिवज्योत रॅलीचे स्वागत आणि सर्वांना नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने शुभेच्छा दिल्या. ते वडाळीभोई ते थेट नासिक पर्यंत त्यांच्या सोबत होते.
 
गरुडझेप मोहिमेंतर्गत आग्रा ते राजगड हे 1200 कि मी अंतर अवघ्या 13 दिवसांत धावत पूर्ण करणारी शिवज्योत रॅली १७ ऑगस्टला आग्र्याहून निघाली आहे. आज या मशाल रॅलीचे नाशिक शिवारात आगमन झाले. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा चार राज्यांतून, आग्रा ते राजगड हे अंतर धावत पुर्ण करणार आहेत. गरुड झेपच्या शिवज्योत रॅलीच्या स्वागतासाठी नाशिकहुन मोठ्या प्रमाणात संस्था हजर होत्या. गरुडझेप शिवज्योत रॅलीस नासिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी शुभेच्छा दिल्या.