आज एकही नवा रुग्ण नाही ; रुग्णसंख्या झाली एक अंकी

इगतपुरीनामा न्युज, दि. ५

काही आठवड्यांपासून एकाच रुग्णसंख्येभोवती ठाण मांडून बसलेली १० संख्या आज बदलली. इगतपुरी तालुक्यात कोरोना उद्रेक झाल्यापासून एकही रुग्ण न सापडल्याचा आजचा ऐतिहासिक दिवस उगवला. असेच काही दिवस सुरू राहिल्यास लवकरच तालुका कोरोनामुक्त होईल असे स्पष्ट झाले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुद्धा वेगाने सुरू असून आगामी काळात ह्याचे फायदे होणार आहेत.

आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. ही अत्यंत आनंदाची बातमी ठरली आहे. आज २ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. स्थिरावलेली दोन आकडी रुग्णसंख्या कमी होऊन आज एक अंकी अर्थात ८ झाली आहे. येत्या काही दिवसात इगतपुरी तालुका निश्चितपणे कोरोनामुक्त होईल असा विश्वास इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी व्यक्त केला.

कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!