हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना ९ टक्के लाभांश – चेअरमन संजय राव : ४९ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – नासिक जिल्हा हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शालिमार नाशिक येथील आयएमए सभागृहात संपन्न झाली. चेअरमन संजय रामु राव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ह्या सभेत २०२२-२३ ह्या आर्थिक वर्षासाठी ९ टक्के लाभांश देण्याचे घोषित करण्यात आले. यावेळी सर्व विषयांवर विस्तृत चर्चा होऊन सभासदांच्या गरजा भागविणे व संस्थेची नेत्रदीपक यशाकडे वाटचाल करण्यासाठी नियोजना करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. सभासदांना विमा संरक्षण लागू करण्याबाबतच्या ऐतिहासिक निर्णयाला सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. व्हॉइस चेअरमन उषा देवरे, सचिव मधुकर शेरेकरव, खजिनदार पृथ्वीराज भामरे, संचालक, प्रशांत अहिरराव, पल्लवी कुलकर्णी, नामदेव वाणी, रमेश देशमुख, रमेश आवारी, सतिष अहिरराव, एस. डी. साबळे, अरुण पगार, गोपाळा गायकवाड, सचिव नितीन गायकवाड आणि सभासद बंधू भगिनी बहुसंख्येने हजर होते. सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्याबद्दल चेअरमन संजय राव यांनी सर्वांचे आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!