इगतपुरीनामा न्यूज – अनघा टूर्स आयोजित श्री दत्त परिक्रमा यात्रा १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख स्थळांना श्री दत्ता परिक्रमा यात्रेद्वारे दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना मिळणार आहे. पिठापुर, कुरवपूर, मंथनगड, कडगंची, गाणगापुर, अक्कलकोट, तुळजापूर, कुमशी इत्यादी दत्त ठिकाणे समाविष्ट असून भाविकांना यात्रेच्या अत्यल्प खर्चात मोठा लाभ मिळणार आहे. ह्या यात्रेचे शुल्क अवघे १४ हजार ४०० रुपये असून यामध्ये सर्व खर्च समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इच्छुक भाविकांना परत न मिळणारी बुकींग रक्कम २ हजार ४०० रुपये भरून ३१ ऑगस्ट पर्यंत बुकिंग करता येईल. ह्या यात्रेच्या अधिक माहितीसाठी अनघा टूर्सच्या 9657583266 ह्या क्रमांकावर संपर्क करता येईल.
ह्या यात्रेमध्ये पिठापुर – श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान, कुंती माधव मंदिर, कुकुटेश्वर स्वामी मंदिर, अनघालक्ष्मी मंदिर, गोपाल बाबा आश्रम, काकीनाडा – ऐश्वर्या अंबिका मंदिर, भवनारायणी मंदिर, त्रिपुरसुंदरी देवी मंदिर, अन्नावरम – सत्यनारायण मंदिर, कुरवपूर – श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर, श्रीपाद श्रीवल्लभ तपस्या भूमी ( शेकडो वर्ष जुना असलेला वटवृक्ष ), टेंबे स्वामी गुहा, पंच देव पहाड, मंथनगड, श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर, गाणगापुर – भीमा अमरजा संगम, भस्माचा डोंगर, कल्लेश्वर मंदिर, श्री दत्त मंदिर / नृसिंह सरस्वती स्वामी निर्गुण पादुका, कुमशी – श्रीदत्त मंदिर ( विश्वरूप पादुका ), ( श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी विश्वरूप रूप दर्शन दिलेले पावन ठिकाण ), कडगंची – श्री दत्त मंदिर ( सगुण पादुका आणि मूळ गुरुचरित्र प्रत दर्शन ), अक्कलकोट – वटवृक्ष मंदिर, समाधी मठ, तुळजापूर – आई तुळजा भवानी माता मंदिर, सोलापूर – दत्त मंदिर, शुभराय मठ ही ठिकाणे समाविष्ट आहेत. आपल्या मानवी जीवनात धनसंपदा, आरोग्यसंपदा आणि मोक्ष मिळावा म्हणुन अनेक भाविक आपल्या घरूनही दत्त महाराजांची सेवा करत असतात. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थानांना एक वेगळे महत्व आहे. दत्ता परिक्रमा यात्रा ही सहल नसून ही एक आध्यात्मिक यात्रा आहे.” येथे मानवाच्या आयुष्याची दिशा बदलणारे शक्तीपिठ श्रीपाद श्रीवल्लभांची जन्म भूमी आणि कर्म भूमी होय. यासाठी अनेक भाविकांना यापूर्वीही अनघा टूर्सतर्फे यशस्वी यात्रा घडवण्यात आलेली आहे.