महाविकास आघाडीचे अव्वल यश ; इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध : शिवराम झोले, संदीप गुळवे, निवृत्ती जाधव, गोरख बोडके आणि ज्ञानेश्वर लहाने यांनी केले नेतृत्व

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – नाशिक जिल्ह्यात खरेदी विक्री संघाच्या निवडणुकांसाठी आज माघारीचा दिवस आहे. संपूर्ण जिल्ह्यात फक्त इगतपुरी तालुक्यातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. इगतपुरी तालुक्यात महाविकास आघाडीच्या एकीमुळे खरेदी विक्री संघावर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरु झाल्याने इगतपुरी तालुक्यात सर्वांचे कौतुक केले जात आहे.

इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, चेअरमन ज्ञानेश्वर लहाने यांनी बिनविरोध निवडीसाठी यशस्वी नेतृत्व केले. बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळात इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, सुनीता संदीप गुळवे, आशाबाई देवगिरे, सुनील जाधव, बेलगाव तऱ्हाळेचे चेअरमन समाधान वारुंगसे, कऱ्होळेचे माजी सरपंच पांडुरंग खातळे, अरुण गायकर, पाडळी देशमुखचे माजी सरपंच जयराम धांडे, प्रकाश गव्हाणे, देविदास जाधव, संजय जाधव, ॲड. अनिल रघुनाथ तोकडे, रमेश धांडे, देवराम म्हसणे, मोहन भोर, भरत कातोरे यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!