

इगतपुरीनामा न्यूज – जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबई येथील फॅन्ड्री फाउंडेशनतर्फे श्री व सौ. अलका मुजुमदार यांच्याकडून इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम धामडकीवाडी येथील वाचनालयासाठी कपाट व कॉम्प्युटर संच भेट देण्यात आले. फॅन्ड्री फाउंडेशनच्या सदस्या संचिता धनवडे यांनी सर्व साहित्य वाडीतील ग्रामस्थांना आदिवासी दिनाची अनोखी भेट पोहच केली. फाउंडेशनकडून भेट मिळालेले साहित्य वाडीतील तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त असल्याचे राज्य आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी मनोगतात सांगितले. फाउंडेशनच्या सहकार्याबद्दल सर्व सदस्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी शिक्षक दत्तू निसरड, गोकुळ आगिवले, खेमचंद आगिवले, बबन आगीवले, लहानू आगिवले, चांगुणा आगिवले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.