डॉक्टर डे, कृषि दिन व समाजसेवकांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि रोपे वाटप संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

अन्नदाता शेतकऱ्यांमुळे सर्वांना जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. तर देवदूत डॉक्टरांमुळे रोगग्रस्त नागरिकांना निरामय आरोग्य लाभण्यास हातभार लागतो. शेतकरी आणि डॉक्टर यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वत्र डॉक्टर डे आणि कृषि दिन साजरा केला जातो. ह्यातच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आले.

डॉ. किरण काकडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश काळे, समता परिषद तालुकाध्यक्ष शिवा काळे, माजी सरपंच रामदास गव्हाणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले. यासह डॉक्टर दिन आणि कृषि दिनानिमित्त घोटी येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

रक्तदान करणाऱ्या सदस्याना उपयुक्त झाडांची रोपे समाजभान जपण्यात आले. झाडे देऊन सन्मान केल्यामुळे रक्तदान सार्थकी लागले असे मत सर्वांनी व्यक्त केले. यावेळी डॉक्टरांना सुद्धा झाडाची रोपे देऊन खऱ्या अर्थाने आज कृषी दिन सुध्दा साजरा करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, रमेश जाधव, तुकाराम वारघडे, हरिष चव्हाण, रामदास गव्हाणे, निलेश काळे, शिवा काळे, डॉ. किरण काकडे, डॉ. मेदडे, डॉ. राहुल परदेशी, डॉ. आगीवले, अर्पण रक्त पेढीचे डायरेक्टर डॉ. जैन, त्यांचे सहकारी टिम आणि रक्तदाते नागरिक उपस्थित होते.