जुनवणेवाडी येथील दुर्दैवी महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक सहाय्य आणि वाडीला तातडीने रस्त्याची सुविधा द्या : गोरख बोडके यांची मंत्री ना. अदिती तटकरे यांच्याकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथील रस्त्याच्या समस्येमुळे बाळासह आदिवासी गरोदर महिलेला जीव गमवावा लागला. याबाबत विधानसभा अधिवेशनात सुद्धा लक्ष्यवेधी दाखल झाली होती. शासनाच्या धोरणामुळे ह्या महिलेला योग्य वेळेत वैद्यकीय सुविधा मिळाली नाही. म्हणून मृत झालेल्या आदिवासी महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून भरघोस आर्थिक मदत करावी. यासह या आदिवासी वाडीसाठी तातडीने रस्त्याची सुविधा देण्यासाठी लवकर पावले उचलावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी केली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे यांना भेटून गोरख बोडके यांनी मागण्यांचे पत्र दिले. यावेळी याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यात आली. ना. अदिती तटकरे यांनी प्रस्तुत प्रकरणी शासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. यावेळी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!