पिंपळगाव मोर भंडारदरा रस्त्यावर जीर्ण वृक्ष कोसळला : वाहतूक विस्कळीत झाल्याने कामगार परतले माघारी

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

पिंपळगाव मोर भंडारदरा रस्त्यावर टाकेद फाट्याच्या खिंडीत जीर्ण आंब्याचे झाड मध्यरात्री कोसळले. रस्त्यावर खड्ड्यांचे संकट ‘आ’ वासून असतांना वृक्ष कोसळून काही काळ तरी नवीन संकट उभे ठाकले आहे. रात्रीच्या वेळी सुदैवाने रहदारी नसल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. कोणताही अपघात झाला नसल्या तरीही दररोजचे चाकरमाणे, कसारा लोकलसाठी पहाटे प्रवास करणारे कामगार, अंबड-सातपूर, गोंदे-वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतींत जाणाऱ्या टाकेद-खेड भागातील शेकडो कामगारांचा आजचा रोजगार बुडाला आहे. मागील काळात ह्याच खिंडीत जीर्ण झाड कोसळून रस्ता बंद झाला होता. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन जीर्ण व मोडकळीस आलेले वृक्ष जीवित अथवा वित्तहानी होण्याच्या आधीच काढून घ्यावेत अशी मागणी ग्रामस्थ उमेश बऱ्हे यांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!