इगतपुरीजवळील तळेगाव येथील एका कारखान्याला लागली आग

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

इगतपुरी शहर हद्दीतील तळेगाव शिवारात असलेल्या एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गोयंका प्लास्टिक असे ह्या कारखान्याचे नाव असून ह्यामध्ये प्लास्टिकचे पुतळे तयार करण्यात येत होते. लागलेल्या आगीत प्लास्टिकच्या पुतळे भस्मसात झाले आहेत. ह्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आह विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या २ वाहनांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

Leave a Reply

error: Content is protected !!