
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेसह भारतीय हत्यार कायदा कलमांप्रमाणे गुन्हा दाखल होता. पोलीस ठाण्याच्या हद्धीतील गौळाणे येथे दोन समाजामध्ये भांडण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनास्थळी तात्काळ तपास पथक रवाना होऊन ह्या गुन्ह्यातील २ संशयित आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे हस्तगत करून वाडीवऱ्हे पोलिसांनी गुन्हा उघड करून कामगिरी केली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर ह्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे आणि त्यांच्या तपास पथकातील प्रविण काकड, विक्रम काकड, मनोज येशी, गांगुर्डे, तुपलोंढे, बोराडे, सोनवणे कसून तपासकार्य करत आहेत. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपी शरद बाळू शेळके, सनी बाळू शेळके दोघे रा. गौळाणे, ता. जि. नाशिक या दोघांना अटक करून हत्यारे हस्तगत केली आहेत.