तुमच्या मोबाईलवर सुद्धा आज सिक्युरिटी अलर्टचा मेसेज अचानक धडकला का ?

इगतपुरीनामा न्यूज – इमर्जन्सी अलर्ट सिस्टम ह्या राष्ट्रीय सार्वजनिक चेतावणी प्रणाली अंतर्गत दुरसंचार विभागाद्वारे आज सकाळी १० वाजेपासून अनेक मोबाईलवर सिक्युरिटी अलर्टचा टेस्ट मेसेज धडकला. मोबाईल वापरत असतानाच्या अनेक वर्षांपासून पहिल्यांदा असा मेसेज आल्याने अनेकांची तारांबळ उडाली. मात्र यामुळे घाबरून जाऊ नये, हा आपत्कालीन व्यवस्थापन करतांना करण्यात आलेला टेस्ट मेसेज आहे. राज्य आणि स्थानिक अधिकारी हवामान माहिती, आसन्न धोके, AMBER सूचना आणि विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्यित स्थानिक घटना माहिती यासारखी महत्त्वाची आपत्कालीन माहिती वितरीत करण्यासाठी ही सिस्टम वापरू शकतात. यासाठी दूरसंचार विभागाद्वारे आज बऱ्याच जणांच्या मोबाईलवर टेस्टिंग मेसेज आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात असे मेसेज आज धडकले आहेत.

जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, तेव्हा सार्वजनिक सुरक्षा अधिकारी तुम्हाला सावध करण्यासाठी वेळेवर आणि विश्वासार्ह प्रणाली वापरतात. यामुळे तुम्हाला मिळू शकणार्‍या वेगवेगळ्या चेतावणी सूचना सिक्युरिटी अलर्टद्वारे मिळतात. वायरलेस इमर्जन्सी अलर्ट (WEAs) हे सार्वजनिक अलर्टिंग प्राधिकरणांकडून आलेले छोटे आणीबाणी संदेश सेल टॉवरवरून स्थानिक पातळीवर लक्ष्यित क्षेत्रातील कोणत्याही WEA-सक्षम मोबाइल डिव्हाइसवर प्रसारित करतात. राज्य आणि स्थानिक सार्वजनिक सुरक्षा अधिकारी, नॅशनल वेदर सर्व्हिस, नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन यांच्याकडून असे संदेश येण्याची शक्यता असते. हे मेसेज फोनवर वेगळी टोन आणि व्हायब्रेशन करून लक्ष वेधून घेतात. या मेसेजमध्ये अतिशय मोजके शब्द असतात. या मेसेजमुळे आपल्या फोनला अथवा आपल्याला कोणताही धोका नसून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

Similar Posts

error: Content is protected !!