अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी उत्तम संधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा या विषयावर हे मार्गदर्शन असून अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी उत्तम संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा बाबत विशेष मार्गदर्शक लेख..!

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३

अभियांत्रिकी सेवा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने ( Union  Public  Service  Commission ) अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा (Engineering Services Preliminary  Examination 2021 ) यासंदर्भातील आवेदन यूपीएससीच्या वतीने प्रसिध्द झाले आहे. अभियांत्रिकी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करावयाचे आहेत.

आयोगाचे संकेतस्थळ
या परीक्षेची संपूर्ण माहिती, नियम, शैक्षणिक पात्रता, अर्ज सादर करण्याची पध्दती, जागांची संख्या, कामाचे स्वरूप, अभ्यासक्रम, पेपरची संख्या, एकूण गुण, परीक्षा केंद्रे या संदर्भातील सविस्तर माहिती आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर दिलेली आहे. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज ऑनलाइन सादर करावयाचे आहेत त्यांनी या संकेतस्थळावरील दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करून, वाचन करुन अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहे.

अर्जाची अंतिम मुदत
या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची अंतिम मुदत दि.२७ एप्रिल २०२१ ही असून एकूण २१५ जागांसाठी आणि साधारणत: विविध २८ पदांसाठीची ही परीक्षा संपूर्ण भारतात एकाच दिवशी आयोजित केलेली आहे.

अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर
०१. Civil Engineering, ०२. Mechanical  Engineering, ०३. Electrical Engineering, ०४. Electronics and Telecommunication Engineering  या अभियांत्रिकी पदवीधरांना करिअर करण्याची चांगली सुसंधी या जाहिरातीच्या माध्यमातून आलेली आहे. www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. अखिल भारतीय स्तरावरील विविध विभागांमध्ये भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारे निवड केली जाते.

परीक्षेची परीक्षा केंद्रे
या अभियांत्रिकी पूर्व परीक्षेची भारतात एकूण ४२ केंद्रे असून महाराष्ट्रात मुंबई व नागपूर ही परीक्षेची केंद्रे आहेत. मुख्य परीक्षेसाठी भारतात एकूण २० केंद्रे असून महाराष्ट्रात मुख्य परीक्षेसाठी मुंबई हे एकमेव केंद्र आहे.

परीक्षेसाठी दोन पेपर
या परीक्षेसाठी दोन पेपर असून पहिला पेपर हा २०० गुणांचा आहे. दुसरा पेपर ३०० गुणांचा असणार आहे. अशाप्रकारे एकूण ५०० गुणांची ही परीक्षा असेल. पहिल्या पेपरसाठी दोन तास तर दुसऱ्या पेपरसाठी तीन तासांचा कालावधी असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. पूर्वपरीक्षेत पात्रता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा ६०० गुणांची असेल.

सविस्तर माहिती
या परीक्षेची पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण, मेडिकल चाचणी, परीक्षा फी, अर्ज करण्याची पध्दत, अभ्यासक्रम व इतर सविस्तर माहिती आयोगाच्या वर दिलेल्या संकेतस्थळावर दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. चांगला अभ्यास, नियोजन व परीक्षेसाठी मेहनत, कष्ट घेतल्यास केंद्रीय स्तरावरील चांगल्या पदाची नोकरी विद्यार्थी प्राप्त करू शकतात हे लक्षात घ्यावे.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

6 Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    अतिशय प्रभावी लेख आहे.

  2. avatar
    विलास जोपळे says:

    UPSC ही परीक्षा व UPSC अभियांत्रिकी परीक्षा…या दोन्ही परीक्षा भारत सरकार प्रशासकीय सेवा या साठी महत्वपूर्ण असतात..या पदांची माहिती , पात्रता, व अर्ज प्रक्रिया ही माहिती सहज उपलब्ध करून दिली ..त्या बद्दल आभार..!

Leave a Reply

error: Content is protected !!