
इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ -.इगतपुरी नगर परिषद तलावाजवळ फिरण्यासाठी आलेल्या तीन युवकांचा आज शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बुडून मृत्यु झाला. स्थानिक युवक या पाहुणे आलेले दोघांना वाचविण्याच्या नादात बुडाला. घटनास्थळी नगरपरिषदेचे कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी या तीन युवकांना बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र तपासणीत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज कादिर शेख वय 41 रा. इगतपुरी ( मामा ) हे रमिज अब्दुल कादीर शेख वय 36 रा. भिवंडी, नदीम अब्दुल कादीर शेख वय 34 रा. भिवंडी यांना वाचविण्यास गेले असता त्यांचाही मृत्यु झाला. मृत झाल्याचे कळताच मृतांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. रुग्णालयात कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे.