घोटीत संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक सही संतापाची उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही सतापाची हा उपक्रम राबवण्यात आला. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात झालेला चिखल व अभद्र झालेल्या युत्या या विरोधात घोटी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे मनसेचे उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी एक सही संतापाची सही करण्यासाठी मनसे पदाधिकारी यांच्यासह विविध पक्षाच्या नागरिकांनीही गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, रामदास आडोळे, प्रताप जाखेरे, गणेश उगले, निलेश जोशी, जनार्दन गतिर, डॉ. रंगरेज, इमरान सय्यद, राजू राखेचा, सौरभ सोनवणे, आकाश जाधव, राज जावरे, सुमित बोधक, अशोक गाढवे, राम शिंदे, दिलीप लहाने, कार्तिक गतिर, महादेव दळवी, अर्जुन कर्पे, मुस्ताक पानसरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!