

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक या ठिकाणी अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने गावातील नागरिकांना भर पावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे. या गावात सहा वर्षांपूर्वी स्मशानभूमी बनवण्यात आली होती. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे स्मशानभूमीची पडझड झाल्याने भर पावसामध्ये उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो आहे. यामुळे तात्काळ अंत्यविधीसाठी योग्य व्यवस्था करावी अशी मागणी गावातील नागरिक करत आहे.