
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी रेल्वे स्टेशन हद्धीमध्ये तीन लकडी भागातील एक व्यक्ती आजारी अवस्थेत मिळून आला. जिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरु असतांना तो ३० जूनला मरण पावला. त्याने मरणापुर्वी अंकुश पांडू मुकणे वय ३२ रा. वैतागवाडी ता. शहापुर जि. ठाणे असे नाव आणि पत्ता सांगितला आहे. त्याची उंची ५ फूट ५ इंच अशी असून रंग काळा सावळा, डोके खोल गेलेले, शरीरबांधा सडपातळ, दाढी व मिशी वाढलेली, लाल धारीचा पांढरा रंगाचा टी शर्ट, कंबरेस ग्रे रंगाची अंडरवेअर आहे. कोणाला काही माहिती असल्यास किंवा अन्य नातेवाईकांची माहिती समजल्यास इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पोलीस अंमलदार राजेंद्र बोराळे मोबाईल क्रमांक 9284019583 यांना संपर्क करावा असे आवाहन इगतपुरी लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.