मुलबाळ होत नसल्याचे टोमणे आणि मारहाणीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या : इगतपुरी पोलिसांनी ४ जणांवर केला गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज – तुमच्यात काही वाईट किंवा कमतरता असेल तर अनेक लोक तुमची टिंगलटवाळी करून टोमणे मारतात. यामुळे नाराज होऊन बरेच लोक चुकीचा निर्णय घेतात. असा प्रकार इगतपुरी तालुक्यातील आडवण येथील एका महिलेसोबत घडला. मूलबाळ नसल्यामुळे तिच्या घरचे लोक वांझोटी बोलून तिला वारंवार टोमणे मारत होते. यासह तिला मारहाण करीत होते. या प्रकाराला कंटाळून तिने विहिरीत उडी मारत आत्महत्या करीत आपला जीव संपवला. सखुबाई जालिंदर डहाळे वय २८ असे ह्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. ही घटना आडवण शिवारात रविवारी उघडकीस आली.

यशवंत नागू नवाळे रा. खडकेद यांनी इगतपुरी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार आत्महत्या केलेल्या महिलेचे पती जालिंदर नारायण डहाळे वय २८, मावस सासू लहानुबाई दमा तातळे वय ५०, नणंद सुगंधा काळू जाखेरे वय ३४, नणंदोई काळू मारुती जाखेरे वय ३६ यांच्यावर आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी कलम ३०६, ४९८ अ, ३२३, ३४  नुसार हा गुन्हा दाखल असून इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे आणि पोलीस पथक तपास करीत आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!