रेल्वेमधून पडलेल्या ३० वर्षीय अनोळखी मृत युवकाच्या नातेवाईकांचा शोध लावण्याचे लोहमार्ग पोलिसांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज -इगतपुरी रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर अप दानापूर एक्सप्रेसमध्ये चढतांना घसरून पडलेल्या ३० वर्षीय युवकाला मृत घोषित करण्यात आले आहे. या युवकाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचे वय ३० वर्ष असून उंची ५ फूट ५ इंच अशी आहे. अधिक माहिती इगतपुरी लोहमार्ग पोलिसांकडे उपलब्ध आहे. या युवकाबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा अन्य नातेवाईकांची माहिती समजल्यास इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन इगतपुरी लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!