
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरीत रेल्वे विभाग तलावाच्या मध्यभागी जाऊन मद्यपान करणाऱ्या २ दारुड्यांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. रविवारी सायंकाळी धोकेदायक अशा ठिकाणी हे २ पर्यटक मद्यधुंद अवस्थेत रेल्वे तलावाच्या मधोमध गेले. त्यांनी तेथे जाऊन मद्यप्राशन करण्यास सुरूवात केली. सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिकांनी याविषयी रेल्वे सुरक्षा दलाला कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेतली. पोलिसांनी दोन्ही तरुणांना घटनास्थळी जाऊन अटक केली आहे. रेल्वे तलाव भागात मद्यपान करणे धोकादायक ठरू शकते. यापुर्वी रेल्वे तलावात अनेक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. याठिकाणी बेकायदा होणाऱ्या घटनांना आळा घालण्यास रेल्वे सुरक्षा दल सक्षम आहे. असे गैरकृत्य करताना दिसल्यास रेल्वे सुरक्षा दलाला कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश कुमार यांनी केले आहे.