
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला. यावेळी स्वराज्य संघटना व ग्रामस्थांनी मुलांचे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचे स्वागत केले. गावात फेरीच्या स्वरूपात सर्व मुलांना एकत्र करून वाजत गाजत शाळेत नेण्यात येऊन स्वागत करण्यात आले. तालुक्यात सर्व ठिकाणी आजपासून शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी स्वराज्य संघटनेकापुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. धारगावचे उपसरपंच श्रीराम रणमाळे यांचे मार्गदर्शन, स्वराज्यचे तालुका संघटक दीपक खातळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. सरपंच निवृत्ती पादीर, उपसरपंच श्रीराम रणमाळे, निवृत्ती खातळे, सुमन लक्ष्मण आहेर, गायत्री दिपक खातळे, गोविंद पारधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्वराज्यचे उपजिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण जाधव, तालुकाध्यक्ष नारायण भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, घोटी गटप्रमुख बाळू सुरुडे, धामणीचे माजी उपसरपंच गौतम भोसले,मुख्याध्यापक जगताप, शिक्षक गवळे, म्हस्के सर आदींनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी गावाचे उज्वल करावे यासाठी छोटासा प्रयत्न केल्याचे उपसरपंच श्रीराम रणमाळे म्हणाले.