विजेचा पोल कोसळल्याने टाकेद बुद्रुक येथे ४ महिला विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे वादळी वाऱ्यामुळे विजेचा पोल पडल्यामुळे ४ आदिवासी महिलांना विजेचा धक्का बसला आहे. यामुळे ह्या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर तातडीने टाकेद बुद्रुक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. ह्या घटनेत अन्य नागरिक आणि महिला तात्काळ बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वीज मंडळाच्या गलथान कारभारामुळे लोकांचा जीव धोक्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जुने विजेचे पोल तात्काळ बदलावेत अशी मागणी करण्यात आली आहे. मंदाबाई अर्जुन वाघ वय ४०, अलकाबाई भीमा वाघ वय ३५, सावित्रीबाई शंकर पवार वय ५५रा. उंटवाडी टाकेद खुर्द, रोशनी जयराम मुकणे २५ रा. शहापूर असे जखमी महिलांची नावे आहेत. खासगी प्रवासी गाडीत शहापूरला जाण्यासाठी बसलेले असतांना गाडीवरच हा पोल कोसळला. यामुळे ह्या दुर्घटनेत ह्या चौघी जखमी झाल्या. सर्व महिला आदिवासी कातकरी समाजाच्या असून त्यांच्यावर स्वखर्चाने उपचार सुरु आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!